Banner

आवाहन

गेल्या दोन वर्षात नियोजित मंदिराच्या प्रांगणात आपला चैत्रोत्सव आनंदाने आणि उत्साहात पार पडला. या कालखंडात, आपण हाती घेतलेले आपल्या कुलस्वामी श्री देव लक्ष्मी पल्लीनाथाचे मंदिर उभारणीचे कार्य आता पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. गर्भगृहाचे आणि कळसाचे बांधकाम पूर्ण झाले असून, गर्भगृहामध्ये व प्रदक्षिणा पथ येथे लादीचे कामही पूर्ण झाले आहे.

मूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहळा उत्सवाच्या संलग्न करावा अशी सर्वांची सूचना होती. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना उपस्थित राहणे शक्य होईल. या वर्षीचा चैत्रोत्सव दि. ३१ मार्च ते ४ एप्रिल २०१५ असा आहे. दि. २७ मार्च २०१५ ते २९ मार्च २०१५ या कालावधीत श्रींचा प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम संपन्न कारीण्याचे योजिले आहे. या सोहळ्याचे निमंत्रण योग्यवेळी आपणास मिळेलच. या सोहळ्यास सर्व कुलोपासाकांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहण्याकरीता हे आग्रहाचे निमंत्रण.

देणगी

श्री देव लक्ष्मी पल्लीनाथ संस्थानामार्फत चालविण्यात येणाऱ्या तसेच भविष्यात साकार होणाऱ्या विविध उपक्रमांसाठी आपण देणगी रुपाने मदत करु शकता. संस्थानामार्फत देणगी स्विकारण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

त्याचप्रमाणे कोअर बँकेने आपण देणगी देऊ शकता.

बँक ऑफ महाराष्ट्र
शाखा लांजा
दूरध्वनी : (०२३५२) २३०४००
खाते नं. ६०११२६७९१५७
एम. आय. सी. आर. कोड : ४१६०१४०१७
आय. एफ. सी. कोड : एमएएचबी०००१३८२

सूचना

"जे कुलोपासक आपली अमूल्य देणगी परस्पर बँक खात्यामध्ये जमा करत आहेत त्यांनी त्याची माहीती संस्थेच्या कार्यालयात कळवणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या नावाची नोंद घेऊन पावती देणे सुलभ होईल."

फोटो

व्हिडीओ

Close
Chaitrotsav