आवाहन १

गेल्या दोन वर्षात नियोजित मंदिराच्या प्रांगणात आपला चैत्रोत्सव आनंदाने आणि उत्साहात पार पडला. या कालखंडात, आपण हाती घेतलेले आपल्या कुलस्वामी श्री देव लक्ष्मी पल्लीनाथाचे मंदिर उभारणीचे कार्य आता पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. गर्भगृहाचे आणि कळसाचे बांधकाम पूर्ण झाले असून, गर्भगृहामध्ये व प्रदक्षिणा पथ येथे लादीचे कामही पूर्ण झाले आहे.

मूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहळा उत्सवाच्या संलग्न करावा अशी सर्वांची सूचना होती. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना उपस्थित राहणे शक्य होईल. या वर्षीचा चैत्रोत्सव दि. ३१ मार्च ते ४ एप्रिल २०१५ असा आहे. दि. २७ मार्च २०१५ ते २९ मार्च २०१५ या कालावधीत श्रींचा प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम संपन्न कारीण्याचे योजिले आहे. या सोहळ्याचे निमंत्रण योग्यवेळी आपणास मिळेलच. या सोहळ्यास सर्व कुलोपासाकांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहण्याकरीता हे आग्रहाचे निमंत्रण.

मंदिराचा सभामंडप, भोजनगृह, भक्तनिवास, अंतर्गत सुशोभिकरण, मंदिर परिसरास कुंपण आदी गोष्टींची पूर्तता होणे गरजेचे आहे. या सर्वांचा विचार करता, संस्थानाला आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे. सर्व कुलोपासकांना या आवाहनाद्वारे जास्तीत जास्त आणि जमेल तेवढया लवकर आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

आपल्या असंख्य कुलोपासकांपर्यंत संस्थानाचे कार्यकर्ते पोहोचलेले नाहीत, त्याचे कारण एकतर कार्यबाहुल्य किंवा पत्ता, संपर्क माहित नाही म्हणूनच. अशा कुलोपासकांचा संपर्क क्रमांक, पत्ता असल्यास तो संस्थानाच्या कार्यकर्त्यास किंवा सदस्यास त्वरीत कळवावा, जेणेकरून त्यांच्याशी संपर्क साधून आर्थिक मदत घेऊ शकतो.

मंदिराचे व्यवस्थापन या दृष्टीने दैनंदिन पूजा, अभिषेक, लघुरुद्र उपक्रम आणि महाप्रसाद अशा सर्व गोष्टींसाठी निधी असणे आवश्यक आहे. या बाबत योग्य तो धोरणात्मक निर्णय या वर्षीच्या चैत्रोत्सवातील सभेमध्ये घेण्यात येईल.

संस्थेला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. सर्वांनी जास्तीतजास्त आर्थिक मदत करून हाती घेतलेले कार्य सुरळीतपणे पार पाडूया. आपण ज्या उद्देशाने हे काम हाती घेतले आहे ते उद्दिष्ट साध्य होण्यास आपणा सर्वांच्या मदतीची गरज आहे. आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत आहोत. आपल्या कुलस्वामी श्री लक्ष्मीपल्लीनाथाचे आशीर्वाद पाठीशी आहेतच. आपल्या कुटुंबावर कृपादृष्टी सदैव राहो हीच श्रींचे चरणी प्रार्थना.

आपला नम्र,
सुधाकर चांदोरकर
अध्यक्ष

देणगी

श्री देव लक्ष्मी पल्लीनाथ संस्थानामार्फत चालविण्यात येणाऱ्या तसेच भविष्यात साकार होणाऱ्या विविध उपक्रमांसाठी आपण देणगी रुपाने मदत करु शकता. संस्थानामार्फत देणगी स्विकारण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

त्याचप्रमाणे कोअर बँकेने आपण देणगी देऊ शकता.

बँक ऑफ महाराष्ट्र
शाखा लांजा
दूरध्वनी : (०२३५२) २३०४००
खाते नं. ६०११२६७९१५७
एम. आय. सी. आर. कोड : ४१६०१४०१७
आय. एफ. सी. कोड : एमएएचबी०००१३८२