आवाहन २

आपणाशी या पूर्वी केलेल्या पत्राव्याव्हारातून, किंवा प्रत्यक्ष भेटीतून, पाली येथील श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थान संदर्भात विशेष वृत्त कळले असेलच. या वर्षीच्या उत्सवातील झालेल्या प्रकारामुळे, श्री लक्ष्मीपल्लीनाथ कुलस्वामी असलेल्या कुलउपासकांनी, उत्सव साजरा करण्यासाठी वेगळे मंदिर बांधण्याचा घेतलेला निर्णय आपणाला या आधी कळलाच असेल. त्या दिशेने आता वाटचाल सुरु करण्यात आली असून, ट्रस्टच्या रजिस्ट्रेशनचे काम चालू आहे. त्या बरोबरीनेच नियोजित मंदिर उभारणीसाठी लागणारी जागा मिळविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हि सर्व कामे आपण दिलेल्या प्रतिसादामुळेच शक्य होत आहेत.

श्रावण महिन्यात, दर रविवारी आपण श्रींची पूजा, अभिषेक, लघुरुद्र अशा प्रकारची सेवा परंपरेनुसार करीत आहोत. या वर्षी उत्सवातील आलेल्या अडचणींवर मात करुन हि सेवा अखंडपणे चालू रहावी म्हणून, श्रावण महिन्यातील चारही रविवार, श्रीराम मंदिर, टिके येथे सेवा करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले होते. त्यानुसार बऱ्याच भक्त मंडळींनी त्याला प्रतिसाद देऊन, टिके येथे या कार्यक्रमास उपस्थित राहून श्रींची सेवा केली व अखंडता पाळली. विशेष म्हणजे चौथ्या रविवारी महारुद्र व स्वाहाकाराचे आयोजन केले गेले. या वेळी दोनशेहून जास्त भक्त उपस्थित होते.

नियोजित प्रकल्पाला आपल्या सर्व भक्तांचे पाठबळ मिळणे जरुरीचे आहे. सर्व कुलातील भक्तांनी या प्रकल्पास थोडा थोडा हातभार लावल्यास हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास वेळ लागणार नाही. या प्रकल्पास आपणा सर्वांस ट्रस्टच्या वतीने, आपणास जसे शक्य असेल त्या प्रमाणे (आर्थिक व वास्तुरूप) मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ट्रस्ट रजिस्ट्रेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर, अधिकृत बँक खाते क्रमांक आपणास कळविण्यात येईल, ज्यायोगे आपणास आर्थिक मदत / देणगी बँकेत भरणे सोईचे होईल. तात्पुरता उपाय म्हणून आपणाला देणगी देताना सोपे व्हावे, म्हणून खाली काही संबंधीत स्थानिक भक्तांची नावे देत आहोत. त्यांच्याशी संपर्क साधून आपण मदत देऊ शकाल. आपल्या मोलाच्या मार्गदर्शनाची व सूचनांची नोंद घेतली जाईल. मदतीची अपेक्षा आहेच, आणि ती कराल हिच अपेक्षा.

संपर्कासाठी नावे :-
श्री. शशिकांत गुण्ये : ०२३५२-२४९०११
श्री. आबा टिकेकर : ९४२१९००९४७
श्री. सुधाकर चांदोरकर : ९४२२६४६७६५
श्री. रवींद्र भाटये : ८२७५६२३७८०

देणगी

श्री देव लक्ष्मी पल्लीनाथ संस्थानामार्फत चालविण्यात येणाऱ्या तसेच भविष्यात साकार होणाऱ्या विविध उपक्रमांसाठी आपण देणगी रुपाने मदत करु शकता. संस्थानामार्फत देणगी स्विकारण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

त्याचप्रमाणे कोअर बँकेने आपण देणगी देऊ शकता.

बँक ऑफ महाराष्ट्र
शाखा लांजा
दूरध्वनी : (०२३५२) २३०४००
खाते नं. ६०११२६७९१५७
एम. आय. सी. आर. कोड : ४१६०१४०१७
आय. एफ. सी. कोड : एमएएचबी०००१३८२