विश्वस्त संस्थेमधील विश्वस्तांची संख्या :

श्री देव लक्ष्मी पल्लीनाथ संस्थान, मठ, ता. लांजा, जि. रत्नागिरी या न्यासाचे अध्यक्ष व अन्य १० विश्वस्त अशी एकूण ११ विश्वस्त संख्या असेल व जास्तीत जास्त विश्वस्त संख्या १५ पर्यंत वाढविण्याचा अधिकार सर्व विश्वस्तांना राहील. विश्वस्त संख्या वाढीचा निर्णय सर्व विश्वस्तांनी बहुमताने घ्यावयाचा आहे.

विश्वस्त निवडीची प्रक्रिया :

न्यासाच्या / संस्थेच्या सभासदांमधील कोणीही सभासदास एखाद्यावेळी विश्वस्त संस्थेमधील सदस्याचे पद रिक्त झाल्यास त्या पदाकरीता अर्ज करता येईल व त्याची योग्य निवड करण्याचा पूर्ण अधिकार विश्वस्त मंडळाला राहील. न्यासाचे सभासदत्व ब्राह्मण जातीतील कोकणस्थ, देशस्थ, कह्राडे, देवरुखे या पोटजातीतील असामीस घेता येईल. महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील ब्राह्मण ज्ञातीतील वर नमूद केलेल्या पोटजातींपुरतेच न्यासाचे सभासदत्व मर्यादीत राहील. विश्वस्तांची नेमणूक ५ (पाच) वर्षासाठी असून विश्व्स्तांपैकी कोणासही न्यासामधून बाहेर पडावयाचे झाल्यास किमान १५ दिवस अगोदर तशी लेखी सूचना विश्वस्त मंडळाचे अध्यक्षांकडे करावी लागेल.

विश्वस्त संस्थेचे सभासदत्व :

धार्मिक क्षेत्राची आवड असणारी आणि पूजनीय व्यक्तीविषयी, संतांविषयी आदर असणारी कोणतीही ब्राह्मण ज्ञातीतील कोकणस्थ, देशस्थ, कह्राडे, देवरुखे या पोटजातीतील १८ वर्षावरील व्यक्ती खालीलपैकी कोणत्याही एका पोट कलमाची पुर्तता करील अशी व्यक्ती ही त्या विशिष्ट प्रकारची सभासद होवू शकेल. न्यासाचा सभासद सदस्य होवू इच्छिणाय्रा व्यक्तीने विहीत नमुन्यात आवश्यक त्या प्रवेश फीच्या रक्कमेवर विश्वस्त मंडळाकडे अर्ज करणे आवश्यक आहे. विश्वस्त मंडळाला अर्ज मंजूर अगर नामंजूर करण्याचा पूर्ण अधिकार राहील. मात्र अर्ज नामंजूर करताना त्यासाठी विश्वस्त मंडळावर त्याचे कारण देण्याचे बंधन राहील. मात्र सदर अर्ज नामंजूर केल्यास सदर व्यक्तीने अर्जासोबत जमा केलेली सभासदत्वासाठीची रक्कम त्यास अर्ज केल्यापासूनचे तीन महिन्याचे आत परत करण्याची जबाबदारी विश्वस्त मंडळावर राहील.

न्यासामध्ये पुढील प्रकारचे सभासद असतील :

आजीव सभासद – न्यासाला कमीत कमी रू. ५,१११/- ची एक रकमी देणगी देणारी वर नमूद केलेल्या ब्राह्मण ज्ञातीतील व्यक्ती ही न्यासाची आजीव सभासद होईल.

सामान्य सभासद - न्यासाला किमान रू. ५०१/- ची एक रकमी देणगी देणारी वर नमूद केलेल्या ब्राह्मण ज्ञातीतील व्यक्ती ही न्यासाची सामान्य सभासद होईल.

सभासदांचे अधिकार :

१) एखाद्यावेळी विश्वस्त मंडळातील सदस्याचे पद रिक्त झाल्यास आजीव सभासदामधील व्यक्तीला अर्ज करता येईल व त्याची योग्य निवड करण्याचा पूर्ण अधिकार विश्वस्त मंडळाला राहील.

२) सभासदाला मंडळाचे सभासदत्व सोडावयाचे असेल तर एक महिना आधी लेखी सूचना विश्वस्त मंडळाच्या सचिवाकडे करावी लागेल.

३) सर्व सभासदांना संस्थेच्या हिताचे दृष्टीने विश्वस्त मंडळास सूचना व सल्ला देता येईल.

सभसदत्व रद्द करणे :

न्यासामधील सभासदाला वेड लागल्यास अथवा त्याचा मृत्यू झाल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्द होईल. सभासदाने न्यासाचे हित व नियम यांना प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष बाधा येईल असे अगर विघातक कृत्य केल्यास त्या सभासदाचे सभासदत्व रद्द करण्यापूर्वी अशा सभासदास कार्यकारणीपुढे आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. तसेच नैतिक अध:पतनाच्या गुन्हयाखाली कोणत्याही न्यायालयाने ६ महिन्यातून अधिक शिक्षा देणारा अंतिम हुकुम केल्यास अशा सदस्याचे सदस्यत्व आपोआप रद्द होईल.

विश्वस्त मंडळ :

विश्वस्त मंडळात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार असे ४ पदाधिकारी व इतर विश्वस्त असे एकूण ११ असामींचे विश्वस्त मंडळ असेल. न्यासाची विश्वस्त पहिले ट्रस्टच्या ज्ञापनामध्ये नमूद केलेल्या ११ व्यक्तींची असेल. सदर विश्वस्त मंडळातील विश्वस्तांची दर ५ वर्षांनी न्यासाचे सर्व सभासदांमधून निवड केली जाईल. विश्वस्त मंडळातील ११ विश्वस्तांपैकी ८ विश्वस्त हे श्री देव लक्ष्मी पल्लीनाथ हे दैवत ज्या ब्राह्मण कुळांचे कुलदैवत / कुलस्वामी आहे अशाच ब्राह्मण कुळातील न्यासाचे सभासदांमधून करणे बंधनकारक राहील. उर्वरीत ३ विश्वस्तांची निवड अन्य सभासदांमधून करावी. यदाकदाचित अन्य सभासदांमधून कोणीही सभासद इच्छूक नसलेस सदर ३ विश्वस्तांची निवड श्री देव लक्ष्मी पल्लीनाथ हे दैवत ज्या ब्राह्मण कुळांचे कुलदैवत / कुलस्वामी आहे अशा सभासदांमधून करावी. यदाकदाचित न्यासाची विश्वस्त संख्या यापूर्वी नमूद केल्याप्रमाणे १५ अशी वाढविणेत आल्यास १५ विश्वस्तांपैकी ११ विश्वस्त हे श्री देव लक्ष्मी पल्लीनाथ हे दैवत ज्या ब्राह्मण कुळांचे कुलदैवत / कुलस्वामी आहे अशाच ब्राह्मण कुळातील न्यासाचे सभासदांमधून करणे बंधनकारक राहील. उर्वरीत ४ विश्वस्तांची निवड अन्य सभासदांमधून करावी. यदाकदाचित अन्य सभासदांमधून कोणीही सभासद इच्छूक नसलेस सदर ४ विश्वस्तांची निवड श्री देव लक्ष्मी पल्लीनाथ हे दैवत ज्या ब्राह्मण कुळांचे कुलदैवत / कुलस्वामी आहे अशा सभासदांमधून करावी. नियमावलीत नमूद केल्यानुसार एखाद्याचे सभासदत्व रद्द झाल्यास त्याठिकाणी संस्थेच्या सभासदांमधील व्यक्तीची निवड करण्याचा सर्वस्वी अधिकार विश्वस्त मंडळास राहील.

न्यासाचा एखादा सभासद न्यासाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार यांपैकी कोणतेही एक पद सलग १० वर्षे भूषवू शकेल. मात्र न्यासाचा कोणताही सभासद विश्वस्त मंडळाचा विश्वस्त म्हणून कार्यरत असलेल्या विश्वस्त मंडळाने मान्यता दिल्यास १० वर्षापेक्षा जास्त काळ राहू शकेल, सलग १० वर्षांनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार यापैकी कोणतेही पद ५ वर्षांचे अंतरानंतर संबंधित सभासद पुन्हा भूषवू शकेल.

देणगी

श्री देव लक्ष्मी पल्लीनाथ संस्थानामार्फत चालविण्यात येणाऱ्या तसेच भविष्यात साकार होणाऱ्या विविध उपक्रमांसाठी आपण देणगी रुपाने मदत करु शकता. संस्थानामार्फत देणगी स्विकारण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

त्याचप्रमाणे कोअर बँकेने आपण देणगी देऊ शकता.

बँक ऑफ महाराष्ट्र
शाखा लांजा
दूरध्वनी : (०२३५२) २३०४००
खाते नं. ६०११२६७९१५७
एम. आय. सी. आर. कोड : ४१६०१४०१७
आय. एफ. सी. कोड : एमएएचबी०००१३८२